छत्रपती शिवाजी महाराज – Shivaji Maharaj Information in Marathi

हॅलो मित्रांनो.. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज बद्दल माहिती मराठीत सांगणार आहे तर चला बघुयात Shivaji Maharaj Information in Marathi. आणखी वाचा – सावित्रीबाई फुले

Shivaji Maharaj Information in Marathi

🚩प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा …!!!🚩

१]पूर्ण नाव –शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
२]जन्म –१९ फेब्रुवारी १६३० शिवनेरी किल्ला, पुणे.
३]मृत्यू –३ एप्रिल १६८० रायगड.
४]वडील –शहाजीराजे भोसले
५]आई –जिजाबाई
६]राजघराणे –भोसले

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज – Shivaji Maharaj Information in Marathi

मरण जरी आले तर चालेल पण शरण जाणार नाही. अशी थोर व्यक्ती म्हणजे राजे शिवाजी महाराज. त्यांच्या मातेचे नांव जिजाबाई आणि पित्याचे नांव शहाजीराजे भोसले.

दिल्लीपतीच्या नरडीचा घोट घेणारे राजे आपल्याला सिंहरुपात दिसतात. पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० साली जिजामातेच्या पोटी महाराजांचा जन्म झाला.

बालपणी त्यांच्या मनावर जिजाबाईंनी चांगले संस्कार केले होते. रामायण – महाभारतातील कथा सांगून त्यांच्या बालमनातवीर आणि महान बनवण्याची इच्छा जिजाबाईंनी निर्माण केली होती.

हुशार, स्वामीनिष्ठ , करारी व अनुभवी अशा गुरुवर्य, आई वडिल यांच्यांकडून राजांनी लष्करी शिक्षणाबरोबर राज्यकारभाराचेही शिक्षण घेतले.

अन्यायाविरुध्द पेटून उठलेल्या बाल शिवाजींनी हरहर महादेव च्या गजरात रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली आणि मोगलशाही, निजामशाही व आदिलशाहीला सुरुंग लावला.

आपल्या लहान वयातच त्यांनी तोरणा किल्ला सर केला. स्वराज्याचेस्थापनेचे हे पहिले पाऊल होते. त्यांनी गावात राहणाऱ्या मावळ्यांची सेना तयार केली. आणि त्या सेनेला घेऊन विजापूरचा किल्ला जिंकला.

स्वराज्यस्थापनेचे कार्य: सत्ता, संपत्ती, सैन्य व किल्ले या चार आधारस्तभांवर स्वराज्यमंदिर उभारण्याचा राजांनी अतोनात प्रयत्न केला व तो सिध्दीस नेला.

तोरणा, राजगड, कोंडाणा आणि चाकण हे किल्ले घेतले. पण त्या वेळी शिवाजी महाराजांनी दाखविलेले कौशल्य, धडाडी, युध्दनिती ही कोणत्याही धुरंधर नेत्याला साजेशी अशीच होती.

अफजलखानसारख्या शक्तिशाली सेनापतीच्या पोटात वाघनखे खुपसून मोठया चातुर्याने त्यांनी त्याचा वध केला. विजापुरचे दुसरे सरदार सिद्दी जोहरने पन्हाळ्याला भीषण वेढा घातला होता, त्यातून महाराजांनी स्वतःची सुटका करुन घेतली.

पुण्याच्या लाल महालात शाहिस्तेखानाची नाचक्की केली. शिवाजी महाराजांना आपल्या बंदी करून आणण्यासाठी, औरंगजेबाने शाहिस्तेखान व दिलेरखानांना त्यांच्याकडे पाठविले होते, पण ते काही महाराजांना हरवू शकले नाही.

शेवटी राजाजयसिंहाला पाठविले गेले. त्याच्या सांगण्यावरुन महाराज आग्याला गेले. तेथुन कौशल्यपूर्वक स्वतःची सुटका करून घेतली. ती आग्याची मिठाईच्या पेटाऱ्यांतून सुटका होय. ह्या घटना त्यांच्या आयुष्यात महत्वाच्या ठरतात हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने.

छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. मरगळलेल्या मराठी जनतेच्या मनात उत्साह निर्माण करण्यासाठीव प्रेरणा देण्यासाठी आपल्या रक्तामांसाचा राजा आपल्यावर राज्य करतो आहे, असे तिला वाटले पाहिजे, जनता सुखी राहावी, ह्या सर्व हेतूंनी त्यांनी राज्याभिषेक करवून घेतला.

राज्यावर बसल्यावर त्यांनी रायगड ही आपली राजधानी केली. राज्याभिषेक झाल्यावर शिवाजी महाराजांनी राज्यात सुधारणा सुरु केल्या करवसुली, शांतीस्थापना, सेनेचे संघटन, शेती इ. क्षेत्रांत मौलिक सुधारणा केल्या स्थलसेनेबरोबरच आरमारही संघटन केले व तीही साधनसामुग्री वाढविली.

त्या काळात मराठी भाषेची प्रगती झाली होती. शिवाजी महाराज मोठे शुर वीर व साहसी होते. तीव्र बुध्दिमत्ता, संघटनकौशल्य, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,संस्कृतीचे रक्षणकर्ते असे थोर सेनानी म्हणून त्यांना कीर्ती लाभली.

वेळ आणि माणसे ओळखण्याची अद्भुत क्षमता व पारख त्यांच्याजवळ होती. ते सर्व धर्म, धर्मग्रंथ आणि धर्मस्थानांचा सन्मान करीत. उत्तम चारित्र्य, मुत्सदेगिरी, राजकारणाची जाण, राष्ट्रकल्याण करणारा राजा, शत्रुचा कर्दनकाळ अलौलिक आणि अद्भुत पराक्रम, प्रजेबद्दल वात्सल्य या गुणांमुळे ते लोकप्रिय झाले.

सर्व भारतीयांच्या अंतःकरणात त्यांना आजही मानाचे स्थान आहे. अशे सर्व गुण धर्म सोडुन दुसऱ्या धर्मात स्थलांतरित करणाऱ्या लोकांनाही त्यांनी परत हिंदू धर्मात घेतले. त्यांना त्यांच्या जीवनात संत तुकारामसारखे गुरु लाभले. दान-धर्म करताना त्यांनी कधीही भेद भाव केला नाही. शिवप्रभूचा अवतार म्हणजे साक्षात् शिवाचाच अवतार ! महाराजांचा मृत्य ३ एप्रिल १६८० रायगड येथे झाला.

काय शिकलात?

आज आपण छत्रपती शिवाजी महाराज बद्दल माहिती – Shivaji Maharaj Information in Marathi मध्ये पहिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment