चिमणी बद्दल माहिती मराठीत – Sparrow Information in Marathi

हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला चिमणी बद्दल माहिती मराठीत – Sparrow Information in Marathi देणार आहे, तर चला बघुयात.

चिमणी बद्दल माहिती मराठीत - Sparrow Information in Marathi
मराठी नाव :चिमणी (Sparrow)
इंग्रजी नाव :House Sparrow (हाऊस स्पॅरो)
आकार :१५ से.मी.
वजन :२४-४० ग्राम.

माहिती – Sparrow Information in Marathi

चिमणीचा चिवचिवाट न ऐकलेला माणूस विरळाच म्हणावा लागेल. अगदी तान्ह्या बाळाला सुद्धा ‘चिऊताई’ माहीत असते. रात्रीच्या वेळी थव्यांनी एकत्र राहणाऱ्या चिमण्या दिवसा जोडीजोडीने किंवा छोट्या थव्यांनी खाद्य शोधत हिंडतात.

दुपारी मात्र थोडी विश्रांती घेतात. करड्या रंगाच्या या इटुकल्या चिमण्या नेहमी कामात असतात. एकतर वर्षातून तीन-चार वेळा वीण होते. त्यामुळे घरट्यात नेहमीच पिल्लं वाढत असतात. पिल्लांचं खाद्य म्हणजे छोटे कीटक आणि अळ्या.

त्या पकडून आणणं, भरवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरटं स्वच्छ करणं या कामांमध्ये चिमण्या दंग असतात. बारकाईनं बघा चिमणा-चिमणीत फरक असतो. काही वर्षांपूर्वी चीनमध्ये सर्व चिमण्या मारण्याची मोहीम निघाली. पण ती मागे घ्यावी लागली.

कारण चिमण्या नाहीशा झाल्यानं किड्यांची संख्या बेसुमार वाढली. अधूनमधून दाणे टिपणाऱ्या ह्या छोट्या चिमण्या पिकांवर येणारे कीटक, आणि त्यांच्या अळ्या खाऊन शेतकऱ्यांना किती मदत करतात, नाही का? मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच काहीसं म्हणता येईल आपल्या चिऊताईबद्दल!

सुप्रसिद्ध पक्षीतज्ञ कै. डॉ. सालिम अली यांनी लहानपणी एका रानचिमणीची (Yellow-throated Sparrow) शिकार केली. तेव्हा पासून त्यांना पक्ष्यांचा अभ्यास करण्याचा छंद जडला.

सुतळी, कापूस, काथ्या, दोया, केरसुणीच्या काड्या, चिंध्या, सण, बुरणुस वापरून तयार केलेला गुंता म्हणजे चिमणीचं घरटं. असं हे घरटं भिंतीच्या भोकात, स्वयंपाकघरातील शिंकाळ्यात, पत्र्याच्या खाली, पोटमाळ्यावर, पोष्टाच्या पेटीत, विजेच्या तारांच्या आधारानं, किंवा दिव्याच्या शेडमध्ये सुद्धा केलं जातं.

काय शिकलात?

आज मी तुम्हाला चिमणी बद्दल माहिती मराठीत – Sparrow Information in Marathi दिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

पोपटाबद्दल माहिती मराठीत – Parrot Information in Marathi

मोराबद्दल माहिती मराठीत – Peacock Information in Marathi

Leave a Comment