सूर्यफूल बद्दल माहिती मराठीत – Sunflower Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला सूर्यफूल बद्दल माहिती मराठीत – Sunflower Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – अबोली फुलाबद्दल माहिती

सूर्यफूल बद्दल माहिती मराठीत - Sunflower Information in Marathi

सूर्यफूल – Sunflower Information in Marathi

१]मराठी नाव –सूर्यफूल
२]इंग्रजी नाव –Sunflower

सूर्यफूल उमलल्यावर पाहायला छानच दिसते. रंग: सूर्यफुलाचा रंग पिवळा असतो व मधोमध काळे पराग (बी) असतात. वर्णन : याची पाने हिरवीगार असतात. झाड फार उंच नसते.

झाड म्हणजे नुसती एक काठी असते. त्याला जिन्यासारखी पाने असतात. पाने कडेने कातरल्यासारखी व खरखरीत असतात. फूल पिवळे आणि देठ हिरवे व लांब असते. या फुलाच्या पाकळ्या लांब व भरपूर असतात.

उपयोग : सूर्यफुलातील काळ्या बियांपासून तेल काढले जाते. त्या बियांचे वरचे टरफल जोड असते. या बियांची शेंगदाणे घालून चटणी करतात.

सूर्यफुलाच्या बियांपासून तेल काढल्यानंतर राहिलेल्या चोथ्यापासून पेंड तयार करतात. ही पेंड दुभत्या जनावरांना भरपूर दूध यावे यासाठी खायला देतात.

सूर्यफुलांच्या खालचे राहिलेले दांडे शेतकरी लोक जळणासाठी वापरतात वैशिष्ट्य : हे फूल सगळ्या फुलांत वेगळे व मोठे दिसते.

सूर्यफुलाची शेती लांबून पाहिली की त्यातील पिवळी फुले व आतील काळ्या बिया एकाच दिशेला उमललेली पाहून, जणू जमिनीवर गालीचा पसरल्यासारखा दिसतो.

लागवड : सूर्यफुलांची लागवड करताना प्रथम जमीन नांगरून नंतर सूर्यफुलाची पेरणी केली जाते. त्याला योग्य पाणी दिल्यानंतर सूर्यफुले उगवतात. फुलाचे पीक भरपूर येण्यासाठी त्याला योग्य खत घालावे लागते.

फुले उमलल्यानंतर ज्या दिशेला सूर्य असतो त्याच दिशेला फुले तोंडे करतात. त्याचा आकारही सूर्यासारखाच असतो. फायदे :

विशेषतः सूर्यफुलाच्या तेलाला बाजारात मोठी मागणी असल्यामुळे शेतकरी यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करतात. सूर्यफुलाची शेती व्यवसायाच्या दृष्टीने आर्थिक फायद्याची असते.

काय शिकलात?

आज आपण सूर्यफूल बद्दल माहिती मराठीत – Sunflower Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment