सुरतेची बदसुरत केली

शाहिस्तेखानाने त्याच्या पुण्यातील दोन-तीन वर्षांच्या मुक्कामात स्वराज्याचा जो भाग लुटून व जाळून उद्ध्वस्त केला होता, स्वराज्याचे फार मोठे नुकसान केले होते त्याची नव्याने उभारणी कशी करायची याची चिंता शिवाजी महाराजांना होती. त्याच प्रमाणे कोकणपट्टी सदैव स्वराज्यात राखता यावी यासाठी सुसज्ज आरमार हवे. जंजिरे हवेत, पण यासाठी खूप पैसे हवेत. ते कसे मिळवायचे याचा विचार महाराज करीत होते. …आणि विचार करता करता त्यांना एक विलक्षण, भलतीच धाडसी कल्पना सुचली. बस् ठरले. मोंगल साम्राज्यात असलेले सुरत शहर लुटायचे.

सुरत म्हणजे औरंगजेबाची साक्षात सोन्याची लंका! कुबेरनगरी! सुरत हे पश्चिम किनाऱ्यावरचे व्यापाराचे नाक होते. पश्चिमेच्या जगाशी सुरतेच्या बंदरातूनच “व्यापार चालत असे. औरंगजेबाच्या साम्राज्यात दिल्लीच्या तोडीचे हेच एकमेव वैभवशाली शहर होते. ह्या शहरात इंग्रज, फ्रेंच, अरब, इराणी, पोर्तुगीज अशा अनेक परदेशी, तसेच स्थानिक व्यापाऱ्यांच्या मोठमोठ्या पेढ्या व दुकाने होती. सुरतेची बाजारपेठ जणू कुबेराचे भांडारच! परदेशी व्यापारी व्यापार करून आपापल्या देशांना गलबते भरभरून पैसा नेत होते. शिवाजी महाराजांना सुरतेतील संपत्ती हवी होती ती फक्त स्वराज्यासाठी.

केवळ स्वराज्यासाठी. औरंगजेबाच्या फौजांनी तीन वर्षे स्वराज्याची नासाडी केली होती. याची भरपाई म्हणून महाराजांना सुरतेची संपत्ती हवी होती. ती मागून मिळणार नाही. अर्ज, विनंत्या करूनही मिळणार नाही. ती लुटूनच आणायची असे महाराजांनी ठरविले. यासाठी सुरतेची खडान्खडा माहिती असावयास हवी. हे काम महाराजांनी बहिर्जी नाईकांवर सोपविले. महाराजांनी आज्ञा करताच बहिर्जी नाईक घोड्यावर बसून निघाले. कुठे? राजगडापासून दीडशे कोस म्हणजे तीनशे मैल दूर असलेल्या सुरतेकडे. सुरत जवळ येताच त्यांनी आपला घोडा एके ठिकाणी ठेवला व अगदी हबेहूब फकिराचा वेष धारण केला.

मग फकीर झालेले बहिर्जी हाती कटोरा घेऊन भिक्षा मागत सुरत शहरात फिरू लागले. फिरता फिरता कुठल्या कुबेरांना भिकेला लावावयाचे, कुणाच्या संपत्तीवर डल्ला मारायचा याची अगदी खडान्खडा माहिती जमा केली. सात-आठ दिवसात सगळी माहिती मिळवून बहिर्जी घोड्यावर बसून परत फिरले. राजगडावर शिवाजी महाराजांना भेटन त्यांनी सरतेची सगळी माहिती सांगितली. बाहना म्हणाले, “महाराज, सुरत मारल्याने अगणित द्रव्य सापडेल. सुरत म्हणजे प्रती कुबेरनगरी आहे. या नगरीत एक किल्ला आहे. त्याचा स्वतंत्र किल्लेदार आहे, पण सर्व सत्ता चैनी व घमेंडखोर सुभेदार इनायतखान याच्या हाती आहे.

सुरतेतील सगळी संपत्ती किल्ल्याबाहेर आहे. सुरतेच्या रक्षणासाठी इनायतखानापाशी अवघे हजार, दीडहजार सैनिक आहेत, पण ते सगळे युद्धाचा अनुभव नसलेले; त्यामुळे आपल्या सैन्यापुढे त्यांचे काही एक चालणार नाही. याशिवाय आपल्या सैन्याचा जाण्यायेण्याचा सुरक्षित मार्ग मी शोधून काढला आहे. काल की महाराजांनी सुरतेचे वर्णन ऐकले आणि त्यांनी मनसुबा पक्का केला. सुरत मारायचीच! हे काम इतरांवर न सोपविता स्वत:च या मोहिमेवर जाण्याचे महाराजांनी पक्के ठरविले. बहिर्जीच्याच मार्गदर्शनाखाली सुरत लुटीची योजना तयार करण्यात आली.

आठ-दहा हजारांचे सैन्य, लूट लादण्यासाठी घोडे, तसेच सरनोबत नेताजी पालकर, नारो बापूजी नन्हेकर, देशपांडे इत्यादींना बरोबर नेण्याचे ठरले आणि महाराज निघाले. ६ डिसेंबर १६६३ रोजी महाराजांनी जगदंबेचे दर्शन घेतले. आईसाहेबांच्या पायांवर मस्तक ठेवले व राजगड सोडला. मराठी घोडदळ, मोंगलाई अमलात दीडशे कोस आत घुसून, औरंगजेबाच्या काळजाचा लचका तोडून आणण्यासाठी निघाले. किया गया महाराज दिवसा एखाद्या जंगलात मुक्काम करीत व रात्री प्रवास करीत. महाराज प्रथम त्र्यंबकेश्वरास आले. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले.

तेथे त्यांनी अशी हल उठविली की, आम्ही औरंगाबादेस जाणार आहोत; स्वारी करणार आहोत. ही हूल सगळीकडे पसरली. अगदी औरंगाबाद परगण्यापर्यंत. त्या बाजूला लोकांची धावपळ सुरू झाली. मोगलांच्या छावणीतले लोक प्रतिकारास सज्ज झाले. महाराज सुरतेवर जातील असे कोणालाच वाटले नाही त्यामुळे महाराजांना अडवायला सुरतेच्या वाटेवर कोणीही आडवा आला नाही. शिवाजी महाराजांची फौज त्र्यंबकेश्वराहून एकाएकी गायब झाली व ती डांगच्या जंगलातून एकदम सुरतेच्या अलीकडे असलेल्या घणादेवी गावात पोहोचली.

घणादेवीत एकदम घबराट पसरली. शिवाजी महाराजांनी घणादेवी गावात लोकांना कसलाही त्रास दिला नाही. त्यांनी लोकांना सांगितले, ‘आम्ही औरंगजेबाचेच सरदार आहोत. त्यामुळे लोकांना जरा हायसे वाटले. एक अनोळखी सैन्य सुरतेच्या दिशेने येत असल्याची बातमी सुरतेस मोंगल सुभेदार इनायतखानास समजली, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. तो अगदी गाफील होता. शिवाजीमहाराज सुरतेच्या दिशेने सरकले. हेरांनी ही बातमी इनायतखानास दिली. आता मात्र सुरतेच्या रस्त्यावर लोक भीतीने ओरडत, धावत सुटले, “शिवाजी आया। शिवाजी आया।” लोकांची पळापळ सुरू झाली. लोक बोचकी, गाठोडी घेऊन पळत सुटले.

सुरतेच्या बाजारपेठेत तर हाहाकार उडाला. जा ‘शिवाजी येत आहे.’ ही हेरांनी दिलेली बातमी ऐकताच इनायतखानाचे धाबे दणाणले. सुरतेत धावपळ सुरू झाली. इनायतखानानेही तयारी सुरू केली. त्याने इंग्रज-डचांकडे तोफांची मागणी केली. धनिक लोक किल्ल्याचा आश्रय मागू लागले. ज्यांनी पैशाच्या थेल्या सोडल्या त्यांना आश्रय मिळाला. इनायतखानाने आपल्या दतामार्फत शिवाजी महाराजांना निरोप पाठविला, ‘तुम्ही सुरतेच्या जवळ येऊ नका. लोकांत घबराट पसरली आहे. हे तुमचे कृत्य बादशहांना आवडणार नाही.

काय हा निरोप ऐकताच महाराजांनी त्या दुतालाच कैद केले आणि आपल्या वकिलामार्फत इनायतखानास एक खरमरीत निरोप पाठविला व तसे पत्रही दिले. वकिलाने इनायतखानाला भेटन सांगितले. “उद्या बुधवारी आमचे महाराज सुरतेत दाखल होतील. त्या वेळी तुम्ही स्वत: आणि हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा व हाजी कासम या सर्वश्रेष्ठ श्रीमंत व्यापाऱ्यांनी महाराजांस जातीने भेटून महाराजांची खंडणी ठरवावी आणि ठरेल ती रक्कम भरण्याची व्यवस्था करावी. हे तुमच्याकडून न झाल्यास आम्हाला शहराची लूट व जाळपोळ करावी लागेल.

मग त्याची जबाबदारी आमच्यांवर नाही!” इनायतखानाने कोणतीच हालचाल केली नाही.राणाजी बहिर्जी नाईकांनी सुरतेची अगदी खडान्खडा माहिती काढली होती. कोणाकडे काय आहे, माल कोठे दडवून ठेवला आहे ही सगळी माहिती महाराजांकडे होतीच. मग काय? मराठी स्वार शहरात घुसले. सुरतेत सामसूम होती. घरांचे दरवाजे बंद होते. स्वारांच्या हातात भर दिवसा मशाली ढणढणत होत्या. मराठ्यांच्या टोळ्यांमागून टोळ्या शहरात घुसत होत्या. स्वार एकेका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घराकडे तलवारीने खूण करीत पुढे दौडत होते. शहराच्या मध्यभागी दणादण घाव घालून मराठ्यांनी दरवाजांची कुसे मोडली.

धडाधड आवाज करीत दरवाजे कोसळले. मशाली घेऊन मराठे आत घुसले. आतून किंकाळ्या उठत होत्या. सोन्यामोत्यांच्या जा लोक गोळा करीत होते. हाजी जाहिद बेगचा वाडा मराठ्यांनी साफ केला. वीरजी व्होरा या व्यापाऱ्याकडे ८० लक्ष रुपयांची संपत्ती होती. मराठ्यांनी त्याचे घर साफ केले. या घरात सोने, रूपे, हिरेमाणकांनी भरलेली सहा पिंपे मिळाली. दोन हिंदू व्यापारी तीस पिंपे संपत्ती घेऊन तापी नदीच्या पलीकडे पळून जात होते. तीस पिंपे संपत्ती म्हणजे निवळ सोने होते. मराठी स्वारांनी ती पिंपे पकडून महाराजांकडे आणली.

अॅबिसिनियाचा वकील खोजा मुराद बादशहाला भेटण्यासाठी सुरतेत आला होता. त्याने बादशहासाठी नजराणा म्हणून सोन्याचा पलंग आणला होता. मराठ्यांनी तो त्याच्याकडून काढून घेतला. शिवाजी महाराज लुटीच्या शामियान्यात बसले होते. पुढे पडलेल्या लुटीची निवड चालू होती. कारकून याद्या करीत होते. थैल्या भरल्या जात होत्या. मराठे नवीन थैल्या ओतीत होते. याच वेळी इनायतखानाचा दूत महाराजांना भेटण्यासाठी आला.

महाराजांच्या सेवकांनी त्याची चौकशी करून त्याला महाराजांकडे नेले. त्याने इनायतखानाचा काही निरोप सांगण्याचा बहाणा करून महाराजांवर एकदम हल्ला केला. त्याच्याकडे जंबिया होता. तो महाराजांना मारणार तोच मराठ्याच्या एका सैनिकाने तलवारीचा घाव घालून त्या मारेकऱ्याचा हात तोडला. त्या मारेकऱ्यावर तलवारीने घाव घालून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. शामियान्यातले मराठे भयंकर खवळले. त्यांनी कैद करून आणलेल्या कैद्यांचीच मुंडकी उडविण्यास सुरुवात केली. इनायतखानाने दगलबाजी केल्यामुळे महाराजांचे लोक पेटून उठले.

शेकडो, हजारो मशाली पेटल्या आणि सुरतेच्या रस्त्यांतून हे मशालवाले मराठे आगी लावीत सुटले. शहरात आगीचा डोंब उसळला. मराठे घरे फोडीत होते. लुटीत होते व लगेच पेटवीत होते. मोगलांना कुमक येत आहे अशा बातम्या येऊ लागल्या. मग महाराजांनी लूट आवरती घेतली. लुटीच्या थैल्या व गोणी एकूण तीन हजार होत्या. त्यात सोने, चांदी, हिरे, मोती, जडजवाहीरच होते. मराठी लष्कराने येताना आणलेल्या रिकाम्या घोड्यांवर लुटीच्या गोणी लादल्या. सर्व लूट घेऊन फौज परत निघाली. महाराज घोड्यावर स्वार झाले. धुमसणाऱ्या सुरतेकडे पाहत महाराज म्हणाले, “औरंगजेबाची दाढी खेचण्याची अनेक दिवसांची आमची इच्छा पूर्ण झाली.

आमचे कोणाशीही व्यक्तिगत वैर नव्हते आणि नाही. आम्ही सुरत लुटली ती औरंगजेबाची म्हणून लुटली. औरंगजेबाने आमच्या मुलखाची सतत तीन वर्षे बरबादी केली; त्याचा सूड म्हणून आम्ही सुरत लुटली.” शिवाजी महाराजांनी चार दिवस सुरतेची मनसोक्त लूट केली. कित्येक कुविख्यात, उर्मट आसामींचे वाडे जाळून भस्म केले, पण त्यांनी सुरतेतल्या कोणत्याही धर्मस्थानाला हात लावला नाही. हिंदू-मुसलमान असा भेदभावही केला नाही. औरंगजेबाला सुरतेच्या लुटीची बातमी समजताच त्याच्या अंगाची लाहीलाही झाली. सुरतेच्या लुटीनंतर शिवाजी महाराजांबाबत मोठीच दहशत निर्माण झाली. मोहीम यशस्वी झाली; म्हणून आनंदित झालेली मराठी सेना अखेर राजगडावर पोहोचली.

Leave a Comment