स्वामी विवेकानंद मद्दल माहिती मराठीत – Swami Vivekananda Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंद मद्दल माहिती मराठीत – Swami Vivekananda Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – लोकमान्य टिळक

स्वामी विवेकानंद मद्दल माहिती मराठीत - Swami Vivekananda Information in Marathi
१]नाव –स्वामी विवेकानंद
२]जन्म –१२ जानेवारी १८६३ उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली.
३]समाधी –४ जुलै १९०२ कोलकत्ता बेलूर मठ
४]आई –भुवनेश्वरी देवी
५]वडील –विश्वनाथ दत्त

जीवन परिचय – Swami Vivekananda Information in Marathi

भारताच्या पुनरुत्थानाच्या काळात आणि हिंदुधर्माच्या पुनरुज्जीवनाच्या काळात स्वामी विवेकानंदाचे स्थान अनन्यसाधारण आहे.

भारतीय सामान्य जनतेला दैन्यावस्थेतून आणि अज्ञानातून सोडविण्यासाठी त्यांनी शिक्षण प्रसाराचे कार्य केले. स्वामीजींचा जन्म कलकत्ता येथे १२ जानेवारी १८८३ रोजी झाला. त्यांच्या मातेचे नाव होते भुवनेश्वरी व पित्याचे नांव विश्वनाथबाबू दत्त. त्यांचे पाळण्यातील नाव वीरेश्वर असे होते.

बिले, नरेंद्र अशा नावानेही त्यांना हाक मारली जाई. बालपणी त्यांची वृत्ती खोडकर होती. बालपणीच त्यांच्या ठिकाणी दानशूरपणा होता. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती.

बालवयातच कोणतीही गोष्ट ते पारखून घेत. झाडावर ब्रह्मराक्षस वगैरे कोणी राहत नाही हे सगळे खोटे आहे हे त्यांनी लहानपणी झाडावर चढून सिध्द करुन दाखविले.

भगवान श्रीकृष्ण आणि हनुमंत हे त्यांचे आदर्श होते. त्यांचे महाविद्यालयन शिक्षण कलकत्ता येथे झाले. शाळेत असतानाच त्यांचे वडील अभ्यासाबरोबर साहित्य, तत्वज्ञान इ. चा अभ्यास त्यांच्याकडुन करुन घेत.

ईश्वरचंद्र विद्यासागरांनी त्यांचे वकृत्वाबद्दल खूप कौतुक केले होते. तत्वज्ञान हा विषय घेऊन ते बी.ए. जनरल असेंब्ली या कॉलेजातून झाले.

प्राचार्य हेस्ट्री हे इंग्रजी शिकवीत असतांना Ecstasy ह्या शब्दाचा उच्चार त्यांच्याकडून झाला. त्यांचा अर्थ समाधी. त्यांची खरोखरच समाधी लागली. नरेंद्राने तेव्हापासुन समाधी, ईश्वराचा शोध इ. विषयी चिंतन सुरु केले आणि ते रामकृष्ण परमहंसांकडे आले.

आध्यत्मिकवराष्ट्रीय कार्य – Swami Vivekananda Information in Marathi

रामकृष्ण परमहंसाकडे आल्यावर त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. आपण ईश्वर पाहिला आहे काय ? असा प्रश्न रामकृष्णांना विचारताच त्यांनी हो उत्तर दिले. मलाही ईश्वर पाहायचा आहे, ही तळमळ नरेंद्राला लागली.

नरेंद्र चिंतन, मनन, ध्यान- धारणा करु लागला. योग्य वेळ येताच रामकृष्णांनी त्यांना आपले अध्यात्मिक धन संक्रमित केले. रामकृष्णांचे शब्द मानव सेवा हीच ईश्वरसेवा हे त्यांच्या मनात घुसून बसले आणि संपूर्ण भारतभर मनुष्यसेवा करण्यासाठी भ्रमण करण्याचे त्यांनी ठरवले.

नदी, नाले, वाळवंट , पर्वत मागे टाकत ते फिरत राहिले. लोकांचे दुःख, दैन्य, अज्ञान, रोगराई, उपासमार, इ. निरीक्षण केले.

देशाची सर्व दृष्टीने सुधारणा करण्याच्या व प्रगतीच्या दृष्टीने निःस्वार्थ भावनेने वाहून घेणारे नवे संन्यासी तयार व्हावयास हवे असे त्यांना वाटले. त्यांच्यामधील पुरुषार्थ जागरुक झाला.

भारतभ्रमणात ते कन्याकुमारीला पोहोचले. १८९२ डिसेंबर २५, २६, २७ असे तीन दिवस त्यांनी खडकावर राहून चिंतन केले. आणि लोकांना दैन्यावस्थेतून बाहेर काढले पाहिजे असे जीवितकार्य त्यांनी ठरविले.

उठा जागे व्हा, थांबू नका, चांगले कार्य करा, हा अमृत बोध त्यांना झाला. अमेरिकेत सर्वधर्मपरिषद भरवली जात आहे, असे त्यांना समजले त्यासाठी तिथे जाण्याचे त्यांनी ठरविले.

११ सप्टेंबर १८९३ ला ते शिकागोला पोहोचले, विवेकानंदांनी भाषणाची वेळ आल्यावर आपल्या गुरुंचे स्मरण करुन त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधु-भगिनींनो हे शब्द उच्चारले.

टाळ्यांचा कडकडाट झाला. अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणात त्यांनी सर्व सभा जिंकली. स्वामीजींचे वक्तृत्व प्रभावी होते. त्यांच्या शब्दांनी ते सर्वांची हृदये जिंकून घेत. पुढे इंग्लंडला गेल्यावर मार्गरेट नोबल त्यांच्या शिष्या झाल्या तिचे नांव भगिनी निवेदिता असे ठेवले.

परदेशातून परतल्यावर त्यांनी १८९८ मध्ये रामकृष्ठ मठ उभा केला. नंतर रामकृष्ण मिशनची स्थापना केली. मठाचे ध्येयधोरण हे आध्यात्मिक व मानवसेवा होते.

भविष्यकाळात नवे वळण दिले पाहिजे. म्हणजे पूर्व-पश्चिम हा भेद राहणार नाही. विज्ञानाच्या साह्याने सर्व गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत.

धर्म हा भारताचा केंद्रबिंदू आहे, गाभा आहे पण धर्मामुळे मानवाच्या चित्ताचे शुध्दिकरण झाले पाहिजे व धर्माने संकुचित दृष्टिकोनातून बाहेर काढून उदार व व्यापक दृष्टिकोन बनविण्यास मानवाला मदत केली पाहिजे असे ते म्हणत.

स्वामीजी संपूर्ण मानवजातीच्या अध्यात्मिक उध्दाराचे कार्य करणारे मार्गदर्शक स्तंभ होते. आपल्या विचारांनी व कार्याने त्यांनी वेदान्त हा प्रत्यक्ष मानवाच्या ऐहिक जीवनात कसा सुखकारक, समृध्द व उन्नत असू शकतो हे दाखवून दिले. त्यांच्या वेदान्ताला व्यावहारिक वेदान्त म्हणतात.

स्वामीजी म्हणतात जेव्हा तुम्ही सर्वांकडे आत्मौपम्य दृष्टीने पाहाल तेव्हा ही स्त्री, हा पुरुष असा भेद तुमच्यात राहणार नाही.

शेवटी असे कार्य करीत असतांना आपला अंतकाळ जवळ आल्याचे त्यांना जाणवले आणि ४ जुलै १९०२ रोजी ते पंचत्वात विलीन झाले. आपल्या तेजस्वी विचारांनी आणि कार्याने अमर झाले. बोधवाक्य :मानवसेवा हीच ईश्वरसेवा.

स्वामी विवेकानंद यांचे मराठी विचार – Swami Vivekananda in Marathi Thought

०१] दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे.
अर्थ – दृढ विश्वास ही फार शक्तिशाली प्रेरणा आहे. कार्य सुरु करण्यापूर्वी काहीही असित्त्वात नसतं. अशावेळी निराश न होता चांगल्या भविष्याची निर्मिती आपल्या कार्यातून होऊ शकेल, असा दृढ विश्वास असेल तरच कार्याला उत्साहाने प्रारंभ होऊ शकेल. अन्यथा कोणतेही कार्य उभंच राहणार नाही.

०२] दुःखी माणसाला मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो.
अर्थ – दीन, दुःखी, दुबळ्या, गरजू माणसांना मदत करणं, हाच सेवाधर्म होय. ईश्वराची सेवा ही अशा जनसेवा रूपानेच घडत असते. प्रार्थनेची कर्मकांडे ही एकाच व्यक्तीपुरती महत्त्वाची असतात पण सेवाकार्यातील प्रयत्न हे सेवकाप्रमाणेच ज्याची सेवा करायची त्याचाही विकास करीत असतात.

०३] आधी कामाला प्रारंभ करा, म्हणजे तुमच्यामधील प्रचंड शक्तीचा तुम्हाला प्रत्यय येईल.
अर्थ – कार्याच्या सुरुवातीला आपल्यातील सुप्त क्षमतांचा आपल्याला परिचय नसतो. पुढे जसजसे कार्य आकारू लागते तसतसे मिळालेल्या अनुभवांनी आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. याचाच परिणाम म्हणजे आपल्यातलं निद्रिस्त सामर्थ्य जागं होऊन प्रचंड ऊर्जेने आपल्या हातून कार्य घडतात, असं आश्चर्यकारक सत्य अनुभवास येतं.

०४] जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही तोपर्यंत जगाचं कल्याण होणं शक्य नाही.
अर्थ – स्त्री आणि पुरुष हे समाजाचे दोन पंख आहेत. पक्षी कधी एकाच पंखानं उडू शकत नाही. जगाची प्रगती न होण्याचं मुख्य कारण स्त्रियांची उपेक्षा व अवहेलना. स्त्रीचा सन्मान हे संस्कृतीचं प्रमुख लक्षण आहे. एक स्त्री प्रगत झाली की एका कुटुंबाचं कल्याण होतं.

०५] शिक्षण म्हणजे मानवाच्या अंगी जे सुप्त पूर्णत्वे आहे, त्याचेच प्रकटीकरण होय.
अर्थ – मनुष्याच्या अंगी अनेक सुप्त गुण, शक्ती बसलेल्या आहेत म्हणूनच मानवी देह, मन, बुद्धी यांच्या सामर्थ्यांने मानवाचा जन्म मौल्यवान आहे परंतु हे सामर्थ्य जणू झोपलेले आहे, त्याला जागे करण्यासाठी, त्याचा उपयोग करण्यासाठी मानवाला काही कौशल्ये शिकावी लागतात , त्यासाठी मानवाला शिक्षणाची आवश्यकता आहे.

स्वामी विवेकानंद यांचे मराठी विचार – Swami Vivekananda Information in Marathi

०६] सामर्थ्य हेच जीवन ; दुर्बलता म्हणजे मृत्यू होय.
अर्थ – जीवन जगण्यासाठी सर्व प्रकारचे सामर्थ्य हवे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक या सर्व जीवनागांनी समर्थ माणूस जगात यशस्वी होतो. याउलट सामर्थ्याचा अभाव म्हणजेच कर्तृत्वशक्तीचा अभाव होय. अशी दुर्बल व्यक्ती म्हणजे जगावरचे नकोसे वाटणारे ओझेच होय.

०७] It is better to wear out than to rust out.
अर्थ – मृत्यू अटळच आहे, तर मग शुद्र जंतूप्रमाणे मरण्यापेक्षा वीरोचित मरण कवटाळणे अधिक चांगले, जरा जीर्ण अवस्थेत खितपत पडून थोडे थोडे मरण्यापेक्षा, अल्पकालच का होईना पण परकल्याणार्थ झटून चटकन मरून जाणे बरे नाही का? शेळी म्हणून हजार वर्षे जगण्यापेक्षा वाघ म्हणून शंभर वर्षे जगणे अधिक चांगले.

०८] वीरभोग्या वसुन्धरा ।
अर्थ – पृथ्वी शूरांची आहे. वीरांची आहे. दुर्बलांची किंवा भ्याडांची नाही. शौर्य केवळ रणागंणातच लागतं असं नाही. संकटानं न खचणं, यशानं न हुरळणं किंवा दुःखानं न विरघळणं हे सुद्धा शौर्यच आहे. शारीरिक सुदृढता आणि मानसिक निर्भयता हा पुरुषार्थाचा गाभा आहे.

०९] ध्येयं साधयामि वा देहं पातयामि ।
अर्थ – मी श्रेष्ठ ध्येय प्राप्त करून घेईन किंवा त्यासाठी देह अर्पण करीन मनुष्याचा निर्धार अशा प्रकारचा हवा. मनुष्याचं ध्येय जसं असतं तसंच श्रेय त्याला मिळत असतं. म्हणून सर्वोच्च ध्येय निश्चित करुन त्याचा ध्यास कधीही सोडू नये. मी तरी संपेन नाही तर माझे कार्य तरी संपेल अशी मानसिकता हवी.

१०] अंधश्रद्धेने मूर्ख बनण्यापेक्षा नास्तिक परवडला.
अर्थ – अंधश्रद्धेमुळे बुद्धी निष्प्रभ होते. बुद्धी दुबळी झाली म्हणजे सारेच गेले. जीवनाचा अंधःपात झाला. मनुष्य नास्तिक असला तरी त्याच्या ठायी जिवंतपणा असतो. तो आपल्याला उपयोगी पडतो. त्यात बदल घडवून आणता येतो. अंधश्रद्धेने मूर्ख झालेला दुराग्रही आणि अपरिवर्तनीय बनतो.

११] संकटांना पाठ दाखविली की संकटं पाठीशी लागतात.
अर्थ – जीवनात संकटे येणारच. त्यांना समोर जायला हवं. त्यांच्याशी सामना केला की सहनशक्ती वाढते. मन खंबीर बनतं. त्यांच्यापासून पळायला लागलो की ती जास्तच पाठीशी लागतात. संकटं नकोत या मागणीपेक्षा ती सोसण्याचं सामर्थ्य मिळविणारी प्रार्थना असावी. कुंतीनं श्रीकृष्णाजवळ अशीच प्रार्थना केली होती.

काय शिकलात?

आज आपण स्वामी विवेकानंद मद्दल माहिती मराठीत – Swami Vivekananda Information in Marathi पहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment