Thomas Edison Information in Marathi – थॉमस अल्वा एडिसन बद्दल माहिती मराठीत

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Thomas Edison Information in Marathi – थॉमस अल्वा एडिसन बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – चार्ल्स डार्विन

Thomas Edison Information in Marathi - थॉमस अल्वा एडिसन बद्दल माहिती मराठीत

माहिती – Thomas Edison Information in Marathi

मुलांनो, मानवजातीवर अनंत उपकार केलेल्या शास्त्रज्ञांचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा थॉमस अल्वा एडिसन याचे नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येते, ते त्याने लावलेल्या हजारो उपयुक्त शोधांमुळे !

स्वयंचलित तारयंत्र, फोनोग्राफ, डायनामो, विजेचा बल्ब, विद्युत मोटर, चलत् चित्रपट असे अनेक शोध एडिसनने लावले. थॉमस अल्वा एडिसन या अमेरिकन शास्त्रज्ञाचा जन्म मिलान, ओहिओ येथे ११ फेब्रुवारी,१८४७ रोजी झाला.

फक्त तीन चार महिनेच तो शाळेत गेला. कारण त्याचे व शाळेचे फारसे पटले नाही. तो बारा वर्षांचा झाल्यावर त्याने घरच्या गरिबीमुळे रेल्वे स्टेशनवर पेपर विकण्याचे काम सुरू केले, फावल्या वेळेत तो वेगवेगळे प्रयोग करण्यात रंगून जात असे.

एका रेल्वेच्या डब्यातच त्याची प्रयोगशाळा होती. नंतर त्याने ग्रँड ट्रंक हेराल्ड नावाचे साप्ताहिक इ.स. १८६२ मध्ये सुरू केले. रेल्वेतीलच एका अधिकाऱ्याच्या मुलाचा प्राण वाचविल्याबद्दल बक्षीस म्हणून त्याला तारयंत्र वापरण्याचे शिक्षण मिळाले.

पुढे त्याला बोस्टन येथील एका कार्यालयात नोकरी मिळाली. अतिशय गरीब असल्यामुळे अगदी मळक्या कपड्यांत तो कामावर रुजू झाला. त्याचा अवतार पाहून तेथील कर्मचाऱ्यांनी त्याची टर उडविली; परंतु त्याने तिकडे लक्ष दिले नाही.

प्रामुख्याने त्याला तारयंत्रावर बसून संदेश घेण्यास फर्माविले, त्याचे तारयंत्रावरील कसब व संदेश घेण्याचा वेग पाहून सर्वजण चकित झाले. सलग चार-साडेचार तास तारयंत्रावर बसून त्याने संदेश घेतला.

इतकेच नव्हे तर पलीकडे तारयंत्रावर बसलेल्या माणसाला एकदाही एकही अक्षर पुन्हा सांगावे लागले नाही, की त्याच्या संदेश पाठविण्याचा वेग कमी करावा लागला नाही.

या वेगाने व इतका वेळ आणि तोही बिनचूक संदेश घेणारा मी आज प्रथमच पाहात आहे.’ अशी प्रांजळ कबुली पलीकडील माणसाला देण्यावाचून गत्यंतर नव्हते. तेथेही त्याच्या संशोधक वृत्तीमुळे तो स्वस्थ बसला नाही.

त्याने तारयंत्रात अनेक सुधारणा केल्या. स्वयंचलित तारयंत्र, एकाच वेळी अनेक संदेश प्रसूत करणारे तारायंत्र वगैरे. त्याच्या या संशोधनाचा उपयोग अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने टेलिफोनच्या संशोधनात केला.

विजेच्या बल्बचा शोध लावताना बल्बमधील तारेसाठी त्याने शेकडा पदार्थ वापरून पाहिले. शेवटी त्याच्या चिकाटीला फळ आले. या बल्बसाठी लागणारी वीज निर्माण करण्यासाठी त्याने १८८२ मध्ये जगातील पहिले मोठे वीजनिर्मिती केंद्र न्यूयॉर्कमध्ये उभे केले.

एडिसनने लावलेल्या ग्रामोफोनच्या शोधामुळे कोणताही आवाज मुद्रित करणे शक्य झाले. या शोधाचे महत्व सर्व संगीतप्रेमींना सांगण्याची आवश्यकता नाही. या ग्रामोफोनमध्ये त्याने सातत्याने सुधारणा केल्या.

त्याच्या कायनेटोस्कोपच्या शोधामुळे चलत् चित्रपट पाहणे शक्य झाले. १९१३ मध्ये त्याने पहिलाचलित चित्र-बोलपट तयार केला. एडिसनने रसायनशास्त्रातही संशोधन केले.

त्याने नुसतेच संशोधन न करता त्या वस्तूंची निर्मितीही केली. तो नुसताच शास्त्रज्ञ नव्हता, तर तंत्रज्ञही होता. या महान संशोधकाचे ८ ऑक्टोबर,१९३१ रोजी निधन झाले.

काय शिकलात?

आज आपण Thomas Edison Information in Marathi – थॉमस अल्वा एडिसन बद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment