विनोबा भावे बद्दल माहिती मराठीत – Vinoba Bhave Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला विनोबा भावे बद्दल माहिती मराठीत – Vinoba Bhave Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – सरदार वल्लभभाई पटेल

विनोबा भावे बद्दल माहिती मराठीत - Vinoba Bhave Information in Marathi
१]नाव –विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे)
२]जन्म –११ सप्टेंबर १८९५ गागोदे , जि. रायगड
३]मृत्यू –१५ नोव्हेंबर १९८२ पवनार, महाराष्ट्र, भारत
४]आई –रखुमाबाई नरहर भावे
५]वडील –नरहर शंभूराव भावे

आचार्य विनोबा भावे परिचय – Vinoba Bhave Information in Marathi

आईने केलेले बालपणीचे संस्कार फार महत्वाचे ठरले. पुढे ते मॅट्रिक झाले. पुढे इंटरपर्यंत शिक्षण झाल्यावर काही दिवस पुण्याला त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्कारली.

लहानपणी त्यांच्या शाळेतील एका शिक्षकाला मुलांना छडीने मारण्याची सवय होती. त्यासाठी शिक्षकांनी चांगली छडी करुन शाळा सुटल्यावर कुलुपबंद कपाटात ठेवली.

दिवसातून एकदा तरी एखाद्यातरी मुलाला ते छडीने ठोकायचे. विनोबाजींना हे वर्तन अजिबात आवडायचे नाही. त्यासाठी त्यांनी कपाटाची किल्ली मिळविल आणि छडी फेकून दिी. असा पाच-पाच वेळ प्रकार घडला.

विनेबाजींचा खोकडरपणा शिक्षकांच्य लक्षात आल्यावर ५०० बैठका काढण्याची शिक्षा शिक्षकांनी विनायकाला दिली. १२५ बैठका काढल्यावर शिक्षक थांब म्हणाले. विनायक म्हणाला, १२३ बैठका काढून झाल्या. पाचशे म्हणजे शंभर अधिक पाच या हिशोबाने १८ जास्तच झाल्या.

बडोद्याला विनोबा भावे यांचे शिक्षण झाले. मोरोपंतांच्या केकावली व आर्याभारतातील शेकडो ओव्या रिकाम्या वेळात त्यांनी पाठ केल्या इ.स. १९०५ साली त्यांनी बडोद्यामध्ये विद्यार्थी मंडळाची स्थापना केली. १९०८ साली बडोद्यामध्ये शिक्षा झाल्यावर त्यांनी खाण्यापित्यात साखर वय॑ केली.

ब्रह्मजिज्ञासा, ज्ञानाची तहान व मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची त्यांची प्रबल इच्छाशक्ती त्यांना बेचैन करीत होती. त्यांनी बडोदा सोडले व ते काशीला जाऊन राहिले. त्यानंतर त्यांचा महात्मा गांधींशी परिचय झाला. सेवा, निष्ठा, व श्रध्दा यामुळे ते गांधीजींचे पट्टशिष्य बनले.

आध्यात्मिक कार्य – Vinoba Bhave Information in Marathi

विनोबाजींच्या काळात स्पृश्य – अस्पृश्य हा भेदभाव होता. तो दूर करण्यासाठी हरिजन – उध्दाराचे त्यांनी मोठे कार्य करून दाखविले.

साफसफाई, ग्रामोद्योग, प्रौढशिक्षण, हरिजनसेवा, सर्वधर्मसमभाव, स्वाध्याय प्रवचने इत्यादीव्दारा विनोबाजींनी लोकांमध्ये सामंजस्य निर्माण केले. वर्धा येथील लक्ष्मीनारायण मंदिर त्यांच्या प्रयत्नांमुळे हरिजनांना खुले करण्यात आले.

गांधीजींच्या हृदय परिवर्तनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. १९२१ ते १९५१ हा तीस वर्षांचा कालखंड विनोबाजींच्या आयुष्यातील महत्वाचा कालखंड होता. या काळात त्यांन निर्माण केलेल्या योजनांचा संपूर्ण देशावर परिणाम झाला होता. सत्याग्रहामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगात जाण्याचा प्रसंग आला.

पण ते घाबरले नाहीत. तुरुंगात त्यांना खुप छळ झाला. धुळ्याच्या तुरुंगात त्यांनी गीता-प्रवचने दिली. ते पुस्तकरुपाने प्रसिध्द झाले आणि २२ भाषांमध्ये त्यांचा अनुवाद झाला. पवनार ही विनोबाजींची कर्मभूमी होती. १२ सप्टेंबर १९५२ रोजी त्यांनी भूदान चळवळीसाठी संपत्तीदानाची मागणी केली.

स्त्री शिक्षणावर त्यांचे विचार मौलिक स्वरुपाचे आहेत. स्त्रियांनी केवळ सुशिक्षितपणे शिकू नये, तर ज्यायोगे स्त्री ही स्वावलंबी बनेल, असे शिक्षण तिने घ्यावे. स्त्रियांनी सरस्वतीसारखे ज्ञानात अग्रेसर व्हावे.

ज्ञानाबरोबर त्यांनी भक्तीही केली पाहिजे. अध्यात्म – विचारातही स्त्रिया प्रवीण व्हाव्यात. विनोबाजींनी सर्वोदय ही कल्पना राबविली. सर्वोदय म्हणजे सर्वांचा उदय- सर्वोदय तत्वज्ञानाचा एकूण विचार हा समन्वयाचा आहे. त्यांच्या मते, मी हिंदू, मी मुस्लिम, मी खिस्त ही भावना ऐक्यसाधक नाही.

तर आपण सर्व मानव आहोत ही भावना निर्माण झाली पाहिजे. त्यांचा सर्वोदयाचा विचार सामाजिक होता. विनोबाजींचे विज्ञानाबद्दलचे विचारही महत्वाचे ठरले. त्यांच्या मते, विज्ञानाचे आणि हिंसेचे सख्य होता कामा नये.

विज्ञानाची शक्ती- निती- निरपेक्ष आहे. यापुढे जगात विज्ञान आणि अध्यात्म राहील. विनोबाजींनी बारा वर्षे, तेरा महिने संपूर्ण देशभर पदयात्रा केल ५० हजार एकरांचे भूदान घडवून आणले. या काळात त्यांनी १२ हजार व्याख्याने दिली आणि वीस ते बावीस भाषांचा अभ्यास केला.

गीताई, गीता- प्रवचने, भूदानगंगा, मधुकर, विचारपोथी ह्या त्यांच्या सर्व ग्रंथांना अफाट लोकप्रियता मिळाली. अनेक अभंगांवर, संतांच्या विचारांवर त्यांनी पुस्तके लिहिली. विनोबा हे फार मोठे राष्ट्रसंत होते..

आज एकविसाव्या शतकात, केवळ भारतालच नव्हेतर संपूर्ण जगाला विनोबाजींचे विचार सतत चांगल्या विचारांची प्रेरणा देतात आणि जीवनखऱ्या अर्थाने समृध्द करण्याचा मार्ग दाखवितात.

२५ डिसेंबर १९७६ पासून ते सर्व क्षेत्रांतून मुक्त झाले. त्यांनी प्रायोपवेशन घेतले. १५ डिसेंबर १९८२ ला त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि शेवटी एक संदेश दिला.

जय जगत् जग जगत् जय जगत् पुकारे जा।
सबके हितके वास्ते अपना सुख बिसराये जा।
घोषवाक्य जय जगत् ।

काय शिकलात?

आज आपण विनोबा भावे बद्दल माहिती मराठीत – Vinoba Bhave Information in Marathi पाहिली आहे, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment